esakal | Katraj : ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर; नागरिक हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर

Katraj : ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर; नागरिक हैराण

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील गोकुळनगर मधील लेन नंबर १२मध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर येऊन ते साेसायट्यांच्या पार्किंगमध्ये जात आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून संडासाचे पाणी आमच्या सासायटीत येत असेल तर इथे राहायचे कसे ? असा संतप्त सवाल हॅमी पार्क, आयडियल पार्क, फ्लॉवर रेसिडेन्सी, यशोधन रेसिडेन्सी, अक्षरा रेसिडेन्सी, पवन पार्क आदी सोसायट्यांमधील नागरिक करत आहेत.

लेन क्रमांक १२ मधील ड्रेनेजचे चेंबर तुंबले असून त्यामधून एखाद्या ओढ्यासारखे पाणी वाहत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी संपूर्ण रस्त्यांवरून जाऊन ओढ्याला मिळते. संपूर्ण रस्ता ड्रेनेजच्या पाण्याने व्यापून टाकला असल्याने नागरिकांना चालायचे कसे ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर येत असतानाच पावसाची भर पडली असून पावसाचेही पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणआत दुर्गंधी तर परसरलीच आहे. शिवाय, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला आहे.

हेही वाचा: 'माझा अकरा वर्षांचा मुलगा गेला, तेव्हा फक्त शाहरुखच होता जो'...

या चेंबरमधून पाणी वर येऊन त्यामधून संडासाची घाणही येते आणि ती रस्त्यांवर साचते. याकडे महापालिका विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मागील सहा ते सात महिन्यांपासून हा त्रास सुरु असल्याचे स्थानिक रहिवाशी सांगत आहेत.

लेन क्रमांक १२ मध्ये मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईनचे काम मुख्य खात्यांकडून करण्यात आले आहे. परंतु, निधीअभावी कात्रज-कोंढवा रस्त्यांपासून न करता अर्धे करण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्यांच्या बाजूला छोट्या व्यासाची लाईन तर ओढ्याच्या पुढील बाजूस मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन आहे. २०१९ ला झालेल्या पावसांमुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पंरतु, यातून प्रशासनाने कुठलाही धडा घेतल्याचे दिसत नाही.

साधारणतः ४०० ते ५०० सदनिकांमध्ये राहणाऱ्या २ ते अडीच हजार नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने यामध्ये लक्ष घालून प्रश्न सोडविण्याची गरज आहे. लोकांच्या संडासाचे पाणी आमच्या घरात येत आहे. - अमोल लोहार, स्थानिक नागरिक त्याठिकाणी ड्रेनेज लाईन छोटी आहे. तसेच या भागात लोकवस्ती वाढली असून त्यामुळे पाऊस पडला की लोक ड्रेनेज लाईनची झाकणं उघडतात. त्यामुळे त्यात राडारोडा जाऊन ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. वरील बाजूस मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईनसाठी मान्यता घेतली असून निधी उपलब्ध झाल्यास काम करण्यात येईल

- शशिकांत निवदेकर, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग

loading image
go to top