
कात्रज : चौकातील उड्डाणपुलाच्या कामामध्ये निर्माण होत असलेले अडथळे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. चौकातील वाहतूक कोंडी आणि भूसंपादनाच्या अडथळ्यांची शर्यत पार करत उड्डाणपुलाचे काम निम्म्यांपर्यंत आले. मात्र, आता उड्डाणपूल उतरविण्यासाठी राजस सोसायटी चौकातील एकूण ११ जागा अडथळा ठरत होत्या. त्या जागा ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे असताना यामधील केवळ ७ जागा ताब्यात आलेल्या आहेत. भूसंपादन विभागाकडून कामाला गती देत या जागा लवकर ताब्यात घ्याव्यात अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.