Pune News : कात्रज घाटाचा मुख्य रस्ता खचल्याने धोका; भिलारेवाडी हद्दीत सातारा रस्त्यावरील घटना

तीव्र उताराच्या ठिकाणीच रस्त्याची एक बाजू खचली असून याठिकाणी नुकताच एक अपघात झाल्याची घटना घडली आहे
katraj ghat main road collapse causes accidents administration
katraj ghat main road collapse causes accidents administrationSakal

कात्रज : भिलारेवाडी गावच्या हद्दीत कात्रज घाटाचा मुख्य रस्ता खचल्याने धोका निर्माण झाला आहे. सातारा रस्त्यावरील या जुन्या दगडी पूलाची एक बाजू खचली असून लवकरात लवकर योग्य उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घाट रस्त्याच्या दुरुस्तीची गरज असून पावसाळ्याच्या तोंडावर वाट न पाहता लवकरात लवकर दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा रस्ता वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे घाट बंद करण्याची वेळ येऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

तीव्र उताराच्या ठिकाणीच रस्त्याची एक बाजू खचली असून याठिकाणी नुकताच एक अपघात झाल्याची घटना घडली आहे. कात्रजसह शहरातील वाहनांना साताऱ्याकडे जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते. रस्ता दुरुस्तीसंदर्भात उपाययोजना न झाल्यास वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरु शकते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने योग्य उपायोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा जुना दगडी पूल असून एका बाजूचा भराव पूर्णपणे बाजूच्या ओढ्यात ढासळला असल्याचे दिसून येते. मात्र, केवळ डागडुजी करुन त्याचा वापर करण्यात येत आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.

हा पूल खूप जुना असून याठिकाणी दुरुस्ती न झाल्यास बाजूच्या ओढ्यातून पूर्णपणे माती वाहून जाऊ शकते. त्यामुळे या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी. तर, महापालिकेने बाजूच्या ओढ्यातील घाणही महापालिकेने साफ करायला हवी. अन्यथा नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.

- सुनिल मांगडे, स्थानिक नागरिक

रस्ता खचल्यासंदर्भात पूर्ण माहिती मिळाली आहे. रस्त्याची कर्मचाऱ्यांकडून पाहणीही करून झाली आहे. लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात येईल.

- देवेन मोरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com