पुणे - जागा ताब्यात नसतानाही पुणे महापालिकेने कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा नारळ फोडला, पण गेले सात वर्ष झाले हा रस्ता रखडला आहे. राज्य शासनाने भूसंपादनासाठी १४० कोटी रुपये महापालिकेला दिले, त्यामुळे कामाला गती येईल अशी शक्यता होती. पण भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाला वेगात पूर्ण करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात केवळ ९ कोटी ५७ लाख रुपयेच खर्ची पडले आहेत.