
पुणे : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न एका वर्षात मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. या रस्त्यासाठीची आवश्यक जागा ताब्यात घेण्यासाठी ४७० कोटी रुपयांचा निधी पुढील दोन महिन्यांत जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.