
पुणे : कात्रज - कोंढवा रस्त्याचे काम करताना कधी तो ८४ मिटर रुंदीचा करायचा, कधी तो ५० मिटर रुंद करायचा, रोखीने मोबदला द्यायचाच नाही, टीडीआर एफएसआयचा मोबदला देण्यासाठी होणारी दिरंगाई यासह अन्य कारणाने या या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. गेल्या सात वर्षापासून या रस्त्याचे रखडल्याने आता भूसंपादनाचा वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जागा मालकांना थेट रोखीने पैसे दिले जाणार आहे. पण हा भूसंपादनाचा खर्च तब्बल ४०० कोटींनी वाढला आहे. २०१७ मध्ये भूसंपादनासाठी ७१५ कोटींचा खर्च येणार होता. आता हा खर्च ११०० कोटीवर गेला आहे. त्यामुळे हा प्रकल्प नाकापेक्षा मोती जड असाच झाला आहे.