Pune Development
sakal
पुणे
Pune Development: जिल्हाधिकाऱ्यांकडे ४७० कोटींचा निधी जमा; कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाला गती
Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने ४७० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केला आहे. या निधीच्या मदतीने रस्त्याचे काम लवकर सुरू होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल.
पुणे : शहराच्या दक्षिण भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला गती मिळणार आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेली ४७० कोटी रुपयांची रक्कम महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केली आहे, अशी माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.

