Katraj-Kondhwa Traffic Jam: कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा कहर; दीड किलोमीटरसाठी दोन तास!; वाहनांच्या लांबच लांब रांगा; वाहतूक नियोजनावर नागरिकांचा संताप

Katraj-Kondhwa Road Faces Severe Traffic Congestion: कात्रज-कोंढवा रस्त्यावर शनिवारी वाहतूक कोंडीचा कहर पाहायला मिळाला. गोकुळनगर चौक ते कात्रज चौक हे अवघे दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागत होते.
Katraj-Kondhwa Traffic Jam

Katraj-Kondhwa Traffic Jam

esakal

Updated on

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केल्याचे शनिवारी (ता. २३) पाहायला मिळाले. गोकुळनगर चौक ते कात्रज चौक हे दीड किमीचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास लागत होते. कात्रज चौकात तासन्‌तास वाहने जागच्या जागी उभी राहत असल्याने एका चालकाने वैतागून चक्क गाडीतच झोप घेतली. मेट्रोचे काम, रस्त्यावरील अतिक्रमणे, रिक्षा व वडाप वाहनांचे बेशिस्त पार्किंग आणि पीएमपीएमएल बसेसचे चुकीच्या पद्धतीने वळण यामुळे कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. भारती विद्यापीठ, दत्तनगर चौक, जुना सर्व्हिस रोड आणि भुयारी मार्ग परिसरातही वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com