

कात्रज, ता. १९ : महामेट्रोच्या वतीने कात्रज पोलिस चौकीसमोरील बसस्थानकावर मेट्रो स्टेशनचे काम बुधवारपासून (ता. २०) सुरू होत आहे. यामुळे या स्थानकावरून सुटणाऱ्या ‘पीएमपी’ बसेसच्या मार्गात बदल करण्यात आला असून, प्रवाशांनी पर्यायी थांब्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मेट्रो कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ‘पीएमपी’च्या मुख्य वाहतूक व्यवस्थापकांनी केले आहे.
असे असतील बदल
- कात्रज बायपास पुलाखालील मोकळी जागा : मार्ग क्र. २, २(अ), ११(क), २४, २४(अ), ९०, १०३, २३५, २३६, ३०१, ३०१(अ), के-११ ते के-१४, के-१८ आणि रातराणी १ व २ मार्गाच्या बसेस येथून सुटतील.
- पुलाखालील नवीन थांबा : मार्ग क्र. ४२, २९८, २९९ व ३३९ या बसेस गुजरवाडीहून आल्यावर कात्रज चौकातून डावीकडे वळून पुलाखालील थांब्यावरून पुढे जातील.
- कात्रज बायपास सर्व्हिस रस्ता : मार्ग क्र. ४३, ४३(अ), ४४, ४५, २१४ व २२८ या बसेस या मार्गावरून धावतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.