पुणे - कात्रज चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे कात्रज येथे असणाऱ्या पीएमपीच्या बसस्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे. २ डिसेंबरच्या रात्री १२ पासून हा बदल होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. .हे लक्षात ठेवा...कात्रज-कोंढवा रस्ता बस स्थानकावरून सुटणाऱ्या बस :-क्रमांक १४०अ, १८८, २०९, २९१, के-१६ व एपी-२ या मार्गाच्या सर्व बसेस राजस सोसायटी चौकातून सुटतील.कात्रज बायपास बस स्थानकावरून सुटणाऱ्या बस - क्र. ४३, ४३अ, ४४, ४५, २१४ व २२८ या बसेस वंडर सिटीसमोरील सेवा रस्त्यावरून सुटतील.कात्रज सर्पोद्यान बसस्थानक - मार्ग क्र. ६१, २९२, २९३, २९६ व २९६अ या मार्गाच्या सर्व बसेस गुजरवाडी बसस्थानक येथून सुटतील.कात्रज पोलिस चौकी बसस्थानक - मार्ग क्र. २४, २४अ व २३५ या बस सर्पोद्यान येथून सुटतील..कात्रज रोड बसस्थानक - कात्रज रोड बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसमार्ग क्र. २अ, ११क, ३०१, ३०१अ, रातराणी बसेस कात्रज डेपोतून संचलनात राहतील.गुजरवाडी-कात्रज बसस्थानक - गुजरवाडी-कात्रज बसस्थानकावरून सुटणारे बसमार्ग क्र. ४२, ९०, १०३, १०३, २९८, २९९ व ३३९ या मार्गाच्या सर्व बसेस कात्रज दूध डेअरीजवळ असणाऱ्या कचरा डेपोपासून संचलनात राहतील.बसमार्ग - क्र. २९४, २९५ व २९७ हे उड्डाणपुलाच्या कामामुळे तूर्तास बंद ठेवण्यात येणार आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.