Katraj Zoo
Katraj Zoosakal

Katraj News : कात्रज प्राणी संग्रहालयातील पसार बिबट्या आढळला १२ तासानंतर

कात्रज प्राणी संग्रहालयातील प्रकार; संग्रहालय प्रशासनाचा गलथान कारभार उघड

कात्रज - राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाला होता. तो १२ तासानंतर आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. १३० एकरांवर वसलेल्या प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीचा बिबट्या पसार झाला होता.

सर्पोद्यानातील विलगीकरण केंद्राजवळील पाण्याच्या टाकीजवळ रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या दिसला. तो झाडीत असल्यामुळे त्याला डार्ट मारून बेशुद्ध करता येत नाही. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याच्या आजूबाजूला तीन पिंजरे लावण्यात आले आहेत. सीमा भिंत ओलांडून तो बाहेर जाणार नाही. काही वेळात त्याला त्याच्या पिंजऱ्यात परत नेण्यात यश मिळेल, असा विश्वास भारतीय सर्प विज्ञान संस्थेचे विश्वस्त श्रीराम शिंदे यांनी 'सकाळशी' बोलताना व्यक्त केला.

हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी साधारणतः साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्यामध्ये बिबट्या नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

पिंजऱ्याच्या वरच्या बाजूची सळई उचकटून तो प्रसार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले. बिबट्या पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर तो पसार झालेला भाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला. मात्र, पूर्ण प्राणी संग्रहालय बंद करण्यात आले नव्हते.

बिबट्याला शोधण्यासाठी अग्निशमन दलासह विविध पथके तैनात करण्यात आली होती. प्राणी संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे शंभरहून अधिक प्राणी असून प्राणीसंग्रहालयाच्या शेजारी दाट लोकवस्ती आहे.

रविवारी रात्री प्राणी संग्रहालयात प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत चार प्राणी ट्रकमधून आणण्यात आले. त्यांना खाली उतरवण्याचे काम पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होते. त्या ठिकाणी विलगीकरणात असलेल्या बिबट्याचा पिंजरा होता. ट्रक व प्राण्यांच्या आवाजाने बिबट्या अस्वस्थ होऊन त्याने सळई वाकवून पळ काढला असावा असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया

रेस्क्यू सेंटरमधील पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आला होता. तो पळून गेलेला नाही. तो आजारी असून प्राणी संघालयायीतलच असल्याने घाबरण्याचे कारण नाही. सर्व तज्ञ मंडळी याठीकणी हजर असून बिबट्या सीमा भिंतीच्या आतच आहे. त्याला बेशुद्ध करून आवश्यक ती प्रक्रिया करण्यात येईल.

- विकास ढाकणे अतिरिक्त आयुक्त पुणे महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com