
कात्रज : कात्रज परिसरातील गोकुळनगर चौक ते खंडोबा मंदिरदरम्यानचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. वाहनचालकांसाठी रस्त्यावरून वाहने चालविणे धोकादायक ठरत आहे. त्यासोबतच खड्ड्यात पाणी साचत असून ते पादचाऱ्यांच्या अंगावर उडाल्याने वादाच्या घटना घडत आहेत. वाहनचालकांना खड्ड्यांमधून वाट काढावी लागत असून, अपघातांचा धोका वाढत आहे.