कात्रज - येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात असणाऱ्या सांबर, चितळ, भेकर या हरीण प्रवर्गीय प्राण्यांची गळून पडणारी शिंगे मागील तीन वर्षांपासून कात्रज उद्यानात ठेवण्यात आली होती. .ती पुणे विभागाचे वन विभागाचे सहायक वनसंरक्षक मंगेश ताठे, कात्रज उद्यानाचे संचालक राजकुमार जाधव, वनपरीक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, खेड शिवापूरचे वन परिमंडळ अधिकारी रुपनवर, कात्रजचे वनरक्षक संभाजी गायकवाड, वन विभागनियुक्त समिती सदस्य महेश कदम यांच्या उपस्थितीत पंचनामा करून नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्यात आली..दक्षिण पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या तसेच देशातील सातव्या क्रमांकाचे १३० एकर भागात असलेल्या कात्रज उद्यानाला दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. वाघ, सिंह, तसेच इतर प्राणी पाहण्यासाठी नागरिक नेहमीच कात्रज येथील प्राणी संग्रहालयाला पसंती देत असतात..कात्रज प्राणी संग्रहालयात सध्या सांबर २३, चितळ ९८, भेकर १८ अशी संख्या आहे. त्यातील नर प्रजातीलाच शिंगे असतात ती प्रजनन काळाअगोदर गळून पडतात व काही कालावधीनंतर पुन्हा येतात. ही गळून पडलेली शिंगे कात्रज उद्यानाकडून सुरक्षित ठेवण्यात आली होती..सुधारित वन्यजीव संरक्षण कायदा १९७२च्या तरतुदीनुसार वन विभागाचे आधिकारी यांच्यासमोर पंचनामा करावा लागतो व नंतर विल्हेवाट केली जाते. त्यानुसार संग्रहालयातील दफनवाहिनीमध्ये पंचनामा करून शिंगाची विल्हेवाट लावण्यात आली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.