Katraj Zoological Museum : कात्रज प्राणी संग्रहालयात सुट्यांमुळे गर्दी, मात्र सुविधांचा अभाव

उन्हाळी सुटीमुळे कात्रजच्या स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात भेट देण्यासाठी लहान मुलांसह अबालवृद्धांची गर्दी होत आहे.
Katraj Zoological Museum
Katraj Zoological Museumsakal

कात्रज - उन्हाळी सुटीमुळे कात्रजच्या स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात भेट देण्यासाठी लहान मुलांसह अबालवृद्धांची गर्दी होत आहे. प्रतिदिन सरासरी पाच ते सहा हजार पर्यटक प्राणी संग्रहालयाला भेट देत आहेत. या माध्यमांतून प्राणी संग्रहालय प्रशासनाला प्रतिदिन सरासरी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. यामध्ये जोडून सुटी आल्यास किंवा शनिवार-रविवारी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, पर्यटकांची गर्दी होत असली तरी सुविधांचा मात्र अभाव असल्याचे पाहायला मिळत आहे.

पर्यटकांची तिकीट खरेदी करण्यासाठी तिकीट खिडकीवर रांग लागते. ती रांग तशीच पुढे पादचारी मार्गांवरही येत असल्याचे अनेकवेळा दिसून येते. सुटीच्या दिवशी तर हा प्रकार सर्सास दिसून येतो. त्यामुळे प्रशासन ऑनलाईन बुकींग सुरु करणार आहे. मात्र, प्रत्यक्षात ही सेवा सुरु झाली नाही. त्यामुळे ही सेवा कधी सुरु होणार असा प्रश्न पर्यटक उपस्थित करत आहेत. ही सेवा लवकर सुरु झाली तर पर्यटकांना तिकीट खिडकीवर रांग लावावी लागणार नाही आणि पादचारी मार्गांवर होणाऱ्या गर्दीचाही सामना करावा लागणार नाही.

प्राणी संग्रहालयातील तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाल्याने दुर्गंधी सुटते. तसेच दुर्गंधीमुळे मच्छरांचा त्रास होतो. आता ड्रोनद्वारे औषध फवारणी केली असून जवळपास ८० टक्के जलपर्णी प्रशासनाने काढली असली तरी, दुर्गंधी कमी झालेली नाही. त्यासाठी तलाव कोरडा करणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिक महेश धूत यांचे म्हणणे आहे.

Katraj Zoological Museum
Honeytrap : हनीट्रॅपचा प्रयत्न स्वत:वरच उलटला; शिक्रापुरातील दांपत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

२१ मे रोजी रविवारी एका दिवसात प्राणी संग्रहालयाला ५ लाख ८७ हजार ९६० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून यादिवशी एकूण १७ हजार ५५९ पर्यटकांनी भेट दिली आहे. यामध्ये १३ हजार ७०९ प्रौढ तर ३ हजार ८२५ लहान मुलांसह १० विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. २०२३-२४ या अर्थिक वर्षातील पहिल्याच एप्रिल महिन्यात प्राणी संग्रहालयाला विविध मार्गातून ६२ लाख ९७ हजार ७५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तसेच, इलेक्ट्रिक बॅटरी ऑपरेटेड वाहनांसाठी आकारण्यात आलेल्या तिकीटाच्या माध्यमांतून २ लाख ६१ हजार ६०० रुपये प्राप्त झाले आहेत.

प्राणी संग्रहालयासाठी असणारे वाहनतळ अपुरे पडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. वाहनतळावर जागा नसल्यास सातारा रस्त्यावर किंवा तिरंगा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटक गाड्या लावतात. त्यामुळे कात्रज डेअरी चौकात वाहतूक कोंडी होते. अशातच अनेकवेळा प्राणी संग्रहालयाच्या वाहनतळावर जादा शुल्क आकारण्यात आल्याचे समोर आले आहे.

Katraj Zoological Museum
HSC Exam : भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर; पोलिस तपास सुरू

पर्यटकांसाठी सोयीसुविधा

पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, इलेक्ट्रिक बॅटरी ऑपरेटेड कार, मुख्य प्रवेशद्वार-सर्पोद्यान अशा लोकांची जास्त गर्दी असणाऱ्या निवडक ठिकाणी वायफाय इंटरनेट सुविधा, विविध प्राण्यांविषयी माहिती असणारे फलक जागोजागी फलक अशा प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवेश केल्यानंतर असलेले पाण्याचे कारंजे बंद अवस्थेत असून अनेक ठिकाणी कचरा पडलेला असून अस्वच्छतेबाबत पर्यटकांच्या तक्रारी आहेत.

Katraj Zoological Museum
Shkrapur Crime : ‘तू माझ्यासोबत चल नाहीतर मी आत्महत्या करेन,’ अशी धमकी दिली आणि तिला थेट पळवूनच नेले.

तिकीट दर

  • प्रौढ व्यक्तीसाठी - ४० रुपये

  • लहान मुलासाठी - १० रुपये

  • इलेक्ट्रिक बॅटरी ऑपरेटेड वाहन - ४० रुपये

प्रतिक्रिया

सुटीच्या पार्श्वभूमीवर पर्यटक उत्साहात बाहेर पडल्याने ही गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, ऑनलाईन तिकीटविक्रिचे सर्व काम पूर्ण झाले असून काही प्रक्रिया बाकी आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करुन ऑनलाईन तिकीट विक्री सुरु करण्यात येणार आहे.

- राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com