esakal | Katraj | सीएस परिक्षेत कात्रजची वैष्णवी देशात पहिली
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज : सीएस परिक्षेत कात्रजची वैष्णवी देशात पहिली

कात्रज : सीएस परिक्षेत कात्रजची वैष्णवी देशात पहिली

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

कात्रज : सीएस जून २०२१ सत्राच्या कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ह परिक्षेचा निकाल आज मंगळवारी (ता. १३) जाहीर झाला आहे. या परिक्षेत कात्रज परिसरातील सुखसागरमधील वैष्णवी बद्रीनाथ बियाणी हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. वैष्णवी सीएसमधील शेवटचा टप्पा म्हणजे प्रोफेशनल परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI)ने कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर केला असून नवीन अभ्यासक्रमांमध्ये वैष्णवीने हे यश मिळवले आहे. तिने एकूण ९०० गुणांपैकी ६०६ गुण मिळवले आहेत.

वैष्णवी बद्रीनाथ बियाणी हिने देशात पहिला क्रमांक

वैष्णवी बद्रीनाथ बियाणी हिने देशात पहिला क्रमांक

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वैष्णवीने आपले शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर विद्यार्थी विकास योजना या संस्थेकडून तिला शिष्यवर्ती मिळाली. त्या माध्यमातून तिने सीएसचे शिक्षण पूर्ण केले. वैष्णवीच्या वडिलांचे राजीव गांधी नगरमध्ये स्टेशनरीचे दुकान असून कुंटुबाच्या उदरनिर्वाहाचे साधन हे दुकानच आहे. सुखसागरनगरमधील हिरामण बनकर शाळेतून वैष्णवीने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीला ती ९३.६० टक्के घेऊन उत्तीर्ण झाली. ११ वी आणि १२ वीचे शिक्षण नुतन मराठी विद्यालयातून (नूमवि) पूर्ण करत बारावीला कॉमर्स शाखेतून ८९.२३ गुणांसह ती उत्तीर्ण झाली होती. मात्र, वैष्णवीचा हा प्रवास खडतर होता.

हेही वाचा: Pune : सिंहगड रस्त्यावरील पाणी प्रश्‍न सुटला; प्रशासनाचा दावा

पण, तिने दिवसभर एका पब्लिक कंपनीमध्ये ट्रेनिंग सुरु ठेऊन सीएसचा अभ्यास पूर्ण करत देशातून प्रथक क्रमांक मिळवला आहे. वैष्णवी सीएसच्या फाऊंडेशन म्हणजे पहिल्या पायरीच्या परिक्षेतही देशातून १७वा क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाली होती. तर दुसऱ्या म्हणजे एक्झिक्युटिव पायरीमध्ये आठवा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तिने तिसऱ्या म्हणजे प्रोफेशनल पायरीला देशातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

सीएस परिक्षा काय असते?

भारतातील कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) ही कंपनी सचिवांचा व्यवसाय विकसित आणि नियमन करणारी व्यावसायिक संस्था आहे. सीएसमध्ये पदवी मिळवण्यासाठी तीन परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पहिले सीएसईईटी (CSEET)नंतर एक्झिक्युटिव्ह, नंतर प्रोफेशनल परीक्षा पास झाल्यावर सीएस पूर्ण होते. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मिळविल्याचा आनंद आज आम्हाला मिळाला आहे. मुलीच्या यशाने आजचा दिवस कधीही न विसरता येण्यासारखा असून आकाश ठेंगणे असल्यासारखे वाटत आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. - संगीता आणि बद्रीनारायण बियाणी, वैभवीचे आई-वडील.

loading image
go to top