esakal | Pune : सिंहगड रस्त्यावरील पाणी प्रश्‍न सुटला; प्रशासनाचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

water supply

Pune : सिंहगड रस्त्यावरील पाणी प्रश्‍न सुटला; प्रशासनाचा दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दांडेकर पुलापासून ते राजाराम पुला पर्यंत सिंहगड रस्त्याच्या बाजूच्या भागात गेल्या अनेक वर्षापासून अनियमित व रात्री अपरात्री पाणी पुरवठा होत होता. मात्र, आता या पाणी प्रश्‍नातून या भागातील नागरिकांची सुटका झाली आहे. या परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी ३५ लाख लिटरच्या नव्या टाकीला जलवाहिनी जोडल्याने पूर्ण दाबाने दिवसा पाणी पुरवठा केला जात असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सांगितले.

हेही वाचा: RSS मध्ये महिलांचाही समावेश?; भागवतांच्या दसरा भाषणाकडे लक्ष

महापालिकेकडून समान पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत शहरात नव्या टाक्या बांधल्या जात आहेत, त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या नियोजनात सुधारणा होणार आहे. सिंहगड रस्ता परिसरात पर्वती येथील एलएलआर टाकीतून पाणी पुरवठा केला जात होता, पण हा भाग सर्वात शेवटी असल्याने या गणेश मळा, बॅंक आॅफ इंडिया सोसायटी, नवशा मारुती मंदिर, सरिता वैभव सोसायटी, श्‍वेता सोसायटी, जयदेव नगर, सरिता नगरी, बिग बाझार एसआरए, केके झोपडपट्टी यासह इतर भागातील भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता.

महापालिकेने या भागात रोहन कृतीका सोसायटी येथे ३५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनच्या काळात सिंहगड रस्त्यावर खोदकाम करून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील अंतर्गत जलवाहिन्या मुख्य वाहिनीशी जोडण्यात आली. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून या भागात दिवसा पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत आहे.

हेही वाचा: पवारांवर वेबसीरीज केली तर कोट्यवधींची कमाई होईल; सोमय्यांचा खोचक टोला

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘दांडेकर पूल ते राजाराम पूल या भागात सिंहगड रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या निवासी भागात गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांना पाण्याचा त्रास होता. पण आत नवीन टाकीतून पाणी दिले जात असल्याने पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे.’’

loading image
go to top