Shirur News : कवठे येमाईत आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई; अष्टविनायक महामार्गावरील कोंडी रोखण्याचा प्रयत्न

Police Crack Down on Traffic Violators at Kavathe Yemai on Ashtavinayak Highway : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे आठवडे बाजारामुळे अष्टविनायक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
Police Crack Down on Traffic Violators at Kavathe Yemai on Ashtavinayak Highway

Police Crack Down on Traffic Violators at Kavathe Yemai on Ashtavinayak Highway

esakal

Updated on: 

कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील आठवडे बाजाराच्या दिवशी अष्टविनायक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताचा वाढता धोका लक्षात घेऊन पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. बाजार रस्त्यालगतच भरत असल्याने महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासह वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.

Loading content, please wait...