

केसकरवाडीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची होणार चौकशी
दोन सदस्यीय समिती नियुक्त; संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : केसकरवाडी (ता. पंढरपूर) येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने दोन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा समितीत समावेश आहे. दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या निर्देशानुसार ही चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी, घटनेच्या वेळी शाळा व वसतिगृह प्रशासनाची कार्यपद्धती, तसेच विद्यार्थी कालव्याच्या पाण्यापर्यंत कसा पोचला, याची वस्तुस्थिती समितीकडून तपासली जाणार आहे. दरम्यान, संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून घटनेबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.
याप्रकरणी मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी हा घातपात असल्याचा आरोप करत संस्थाचालक व संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. चौकशी समिती घटनास्थळाची पाहणी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्याची शक्यता आहे. त्यानंतर वस्तुस्थिती व जबाबदारी निश्चित करणारा अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.