सर्वसामान्य कुटुंबातील सरपंच; मित्रांकडुन आलिशान कार भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarpanch Dattatray Hargude

केसनंदच्या सरपंचपदी सर्व सामान्य कुटुंबातील दत्तात्रय मारुती हरगुडे यांची बिनविरोध निवड होताच त्यांच्या मित्रांनी त्यांना सुमारे 46 लाख रुपये किमतीची आलिशान कार भेट देत अनोखी मित्रता जपली.

Car Gift : सर्वसामान्य कुटुंबातील सरपंच; मित्रांकडुन आलिशान कार भेट

वाघोली - केसनंदच्या सरपंचपदी सर्व सामान्य कुटुंबातील दत्तात्रय मारुती हरगुडे यांची बिनविरोध निवड होताच त्यांच्या मित्रांनी त्यांना सुमारे 46 लाख रुपये किमतीची आलिशान कार भेट देत अनोखी मित्रता जपली. या भेटीने तेही भारावून गेले. निवडीनंतर मोठा जल्लोषही करण्यात आला.

केसनंदच्या सरपंचपदी दत्तात्रय मारुती हरगुडे तर उपसरपंच पदी सुरेखा सुभाष बांगर यांची आज बिनविरोध निवड झाली.

सरपंच सचिन हरगुडे व उपसरपंच अक्षदा हरगुडे यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्त झाली होती. आज झालेल्या सरपंचपद निवडणुकीत सरपंच पदासाठी दत्तात्रय हरगुडे व उपसरपंच पदासाठी सुरेखा बांगर यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर जल्लोष करण्यात आला. सरपंच नावाचा भला मोठा हार बनविण्यात आला होता. क्रेनच्या साह्याने तो उचलून धरण्यात आला. मित्र व समर्थक यांनी जल्लोष करीत भंडाऱ्याची उधळण केली. ग्रामसेवक प्रदीप ढवळे, अशोक शिंदे, बगाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. याप्रसंगी सदस्य, ग्रामस्थ मोठयाप्रमाणावर उपस्तीत होते.

टॅग्स :punecar