Ketan Agarwal Murder Case : ... तर तिलाही त्याच किल्ल्यावरुन ढकलून द्या, सियाच्या वडिलांची धक्कादायक मागणी

Siya Goyal : पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर सियाने चेतन चौधरीला इशारा दिला. त्यानंतर चेतनने केतनला दरीत ढकलले, आणि हा कट पूर्वनियोजित होता. चौकशीत सियाने हा कट स्वतः रचल्याची कबुली दिली असून चेतनचाही सहभाग स्पष्ट झाला.
Family Reactions: Shocking Statements by Siya Goyal’s Parents

Family Reactions: Shocking Statements by Siya Goyal’s Parents

esakal

Updated on

Ketan Agarwal Murder Case Key Developments So Far : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. अशातच मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांनी मागणी केली आहे की, जर त्यांची मुलगा दोषी आढळली, तर तिलाही त्याच किल्ल्यावरून खाली ढकलून दिले जावे. आरोपी सियाचे वडील प्रवीण गोयल म्हणाले की, माझी मुलगी असे कृत्य करू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. दरम्यान, तिच्या आईने सांगितले की, केतन आणि सिया यांच्यात कधीही तणाव दिसून आला नाही आणि ते सतत एकमेकांच्या संपर्कात होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com