Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी
केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल हिला रविवारी (ता. २८) लोहगड किल्ल्यावर नेत ‘क्राइम सीन रिक्रिएशन’ अर्थात प्रसंगाची पुनर्निर्मिती केली.
लोहगड - केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल हिला रविवारी (ता.२८) लोहगड किल्ल्यावर नेत ‘क्राइम सीन रिक्रिएशन’ अर्थात प्रसंगाची पुनर्निर्मिती केली. सुमारे अडीच तास ही प्रक्रिया चालली.