

Accused conducted 'reiki' of Lohagad fort for Ketan Agarwal murder case
esakal
पुणे : लोहगडावरील केतन अग्रवाल खून प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. केतनचा काटा काढण्यासाठी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मे महिन्यापासूनच लोहगड किल्ल्याची ‘रेकी’ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्वतःला वाचवण्यासाठी आरोपींनी त्यांच्या मोबाइलमधील सर्व कॉल्स, मेसेज डिलीट केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्यांचे मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत.