Ketan Agarwal Case : चेतनच्या कृत्यामुळे कुटुंब धास्तावले; फ्लॅटला कुलूप लावून रातोरात झाले पसार!

Pune Murder Case : लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून केतनची हत्या करण्यात आली आणि दोघांना अटक होऊन ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. चेतनच्या अटकेनंतर त्याचे कुटुंब बदनामीच्या भीतीने कोंढवा येथील फ्लॅट बंद करून रातोरात पसार झाले.
Family of Main Accused Goes Missing Overnight

Family of Main Accused Goes Missing Overnight

esakal

Updated on

Pune Ketan Agarwal Murder Case Shocking Details Revealed : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. याच प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी कट रचून सुनियोजित पद्धतीने केतनची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन याचे कुटुंब बदनामीच्या भीतीने रातोरात पसार झाले आहे. हे कुटुंब पुण्यातील कोंढवा बुद्रुक भागातील 'श्री पार्श्व नगर सोसायटी' या उच्चभ्रू वसाहतीत राहत होते. चेतनच्या अटकेपासून त्यांचा फ्लॅट बंदच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com