

Lohagad Ketan Agrawal Murder Case Police Reveal Planned Murder Fake Mahi Account Recce and Two Failed Attempts
esakal
-सागर आव्हाड
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती या हत्येमागील नियोजनबद्ध कटाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तीन आरोपींविरोधात तब्बल ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी सुरुवातीला केतनला अपंग करण्याचा प्रयत्न करण्याचा कट रचला होता. त्यानंतर परराज्यातील व्यक्तीच्या माध्यमातून त्याला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करण्याचे नियोजन करण्यात आले.