सुरक्षा रक्षकाचा जबाब, तांत्रिक पुराव्यांवर भर

सुरक्षा रक्षकाचा जबाब, तांत्रिक पुराव्यांवर भर
Published on

लोणावळा, ता. २५ : लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात दिवसागणिक नवे खुलासे समोर येत असून, आता किल्ल्यावरील सुरक्षारक्षकाच्या जबाबातून काही महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्याची माहिती मिळत आहे. याची पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे.
किल्ल्यावरील सुरक्षारक्षक धीरज जाधव यांनी या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे नमूद केल्याचे समजते. तपास पथक या जबाबाची घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांशी पडताळणी करत आहे.
पोलिस तपासात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील कथित कटाबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे वृत्त आहे. तपास यंत्रणांना एका कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशनची माहिती तसेच इतर तांत्रिक पुरावे मिळाले आहेत. हत्या करण्याच्या कटाची आखणी याच ठिकाणी झाल्याचा पोलिस यंत्रणांचा दावा आहे.

आरोपींकडून परस्परांवर आरोप
चौकशीदरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी हे एकमेकांवर कट रचल्याचा आरोप करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दोघांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळत असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे सत्य काय आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुराव्यांवर अधिक भर दिला जात आहे.

पासपोर्ट गायब झाल्याचा दावा
या प्रकरणात केतन अग्रवाल यांच्या वडिलांनीही काही गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. मुलाचा पासपोर्ट गायब झाल्याचा दावा त्यांनी केला असून, यापूर्वीही केतनला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com