

Ketan Agrawal Murder Case: Mobile Evidence, Third Suspect & Rajasthan Link
esakal
Ketan Agrawal Murder Case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे महत्त्वाची माहिती समोर येत आहे. लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल यांना कड्याखाली ढकलण्यापूर्वी त्यांचा मोबाईल फोन मुख्य आरोपी सिया गोयल हिच्याकडे होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील डिजिटल पुरावे, संभाव्य कटकारस्थान आणि आरोपींच्या भविष्यातील योजनांबाबत तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहे.