पुणे - हप्ता देण्यास नकार दिल्याने तिघांनी एका तरुणासह त्याच्या मित्रावर हत्याराने वार केल्याची घटना खडकीतील रेंजहिल्स परिसरात घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे..निहाल गवळी (वय-२०, रा. खडकी) आणि पृथ्वी पवार उर्फ नानू (वय २०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार गणेश रास्ते उर्फ पिट्या (वय-२०) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गंगाराम गायकवाड (वय ४०, रा. सावित्री विहार, खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गंगाराम हे त्यांचे मित्र परशुराम गायकवाड यांच्यासह रेंजहिल्स येथील छोट्या बोगद्याजवळ थांबले होते. त्या वेळी आरोपींनी जुन्या वादातून ‘आम्हाला हप्ता का दिला नाही?’ असे म्हणत वाद उकरून काढला. आरोपींनी गंगाराम आणि परशुराम यांच्यावर हत्याराने वार करून जखमी केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.