Pune : खडकवासला धरणातून साडेतीन हजार क्यूसेकचा विसर्ग

पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातील विसर्ग वाढू शकतो. नदी काठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी
Pune : खडकवासला धरणातील विसर्ग साडेतीन हजार क्यूसेकचा विसर्ग
Pune : खडकवासला धरणातील विसर्ग साडेतीन हजार क्यूसेकचा विसर्गsakal
Updated on

खडकवासला : खडकवासला धरण सकाळी दहा वाजता ९७ टक्के झाल्यावर या धरणातून १०वाजता ८५६क्यूसेक, १२ वाजता एक हजार ७१२ क्यूसेक, दुपारी तीन वाजता तीन हजार ४२४ क्यूसेक विसर्ग मुठा नदीत सोडला आहे.

'पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातील विसर्ग वाढू शकतो. नदी काठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी.' असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे. खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, वरसगाव व टेमघर धरणात या तीन ही धरणात सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत पाऊस पडलेला नाही. फक्त पानशेत येथे एक मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Pune : खडकवासला धरणातील विसर्ग साडेतीन हजार क्यूसेकचा विसर्ग
लसीकरणामध्ये बारामतीने मारली बाजी

पानशेत धरण १०० टक्के भरले आहे. या धरणातून वीज निर्मितीसाठी ६०० क्यूसेक पाणी सोडले आहे. वरसगाव १००टक्के भरले आहे. वरसगाव धरणातून ४४४० क्यूसेक पाणी मोसे नदीत सोडले आहे. टेमघर धरण ९९ टक्के झाले आहे. पानशेत, वरसगाव मधून सोडलेले एकूण पाच हजार ०४० क्यूसेक पाणी खडकवासला धरणात जमा होते. खडकवासला धरणातून नदीत सोडलेल्या पाण्याच्या व्यतिरिक्त कालव्यातून एक हजार १५५ क्यूसेक पाणी शेतीसाठी सोडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com