esakal | लसीकरणामध्ये बारामतीने मारली बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

लसीकरणामध्ये बारामतीने मारली बाजी

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : लसीकरणामध्ये बारामती तालुक्याने बाजी मारली असून आजपर्यंत तब्बल 2 लाख 81 हजार 190 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या मध्ये पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. बारामतीत जवळपास 3 लाख 40 हजार जणांचे लसीकरणाचे प्रशासनाचे उद्दीष्ट आहे.

गेल्या आठवड्यात दोनदा मिळून जवळपास 30 हजार डोस उपलब्ध झाल्यामुळे लसीकरणाला चांगला वेग मिळाला आहे. बारामती शहर व तालुक्यातही विविध लसीकरण केंद्रावरुन लोकांना लस दिली जात आहे. बारामतीत शासकीय आकडेवारीनुसार 54 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची टक्केवारी 33 इतकी आहे. अधिकाधिक नागरिकांना लवकरात लवकर लस देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती डॉ. खोमणे यांनी दिली.

हेही वाचा: राष्ट्रीय महिला आयोगाची राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर सडकून टीका

दुसरीकडे बारामतीतील कोरोनाबाधितांचीही संख्या कमी होते आहे. बारामतीची पॉझिटीव्हीटीची टक्केवारी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाचपेक्षा कमी असल्याने प्रशासनास तो दिलासा आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तपासण्या करण्याचा विक्रमही बारामतीच्या नावावर असून बारामतीतील तपासण्या अधिक होत असल्याने टक्केवारी मर्यादीत राहण्यास त्याचा फायदा होतो आहे.

हेही वाचा: सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

दरम्यान, आजअखेर बारामतीत 29262 रुग्णांना कोरोना झालेला असून त्या पैकी 28446 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. कोरोना सुरु झाल्यापासून बारामतीत 735 जणांचा मृत्यू झाला असून म्युकरमायकोसिसचे बारामतीतील रुग्ण 31 इतके आहेत. या 31 जणांपैकी केवळ चार जणांवर उपचार सुरु आहेत.

loading image
go to top