
Khadakwasla News
Sakal
निलेश चांदगुडे
किरकटवाडी : खडकवासला परिसरातील चार अंगणवाड्या गेल्या तीन महिन्यांपासून अक्षरशः अंधारात आहेत. थकित वीजबिल न भरल्यामुळे महावितरण विभागाने या अंगणवाड्यांचे मीटर काढून नेले आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या शिक्षणावर, त्यांच्या दैनंदिन उपक्रमांवर तसेच पोषण आहार योजनांवर मोठा परिणाम होत असून शेकडो लहानग्यांचे बालपण अक्षरशः अंधारात गेले आहे.