

Demand for Immediate Repair of 'Ayushman Arogya Mandir'
Sakal
किरकटवाडी : खडकवासला गावातील पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्राची जुनी इमारत धोकादायक स्थितीत आहे. या केंद्राच्या भिंतींमध्ये उगवलेल्या छोट्या रोपांमुळे भिंतीला भेगा पडल्या असून त्या ढासळण्याचा धोका आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.