

Heavy July Rain Pushes Khadakwasla Dam Chain to Highest Water Storage Growth in Five Years Near Pune
sakal
-नरेंद्र साठे
पुणे : खडकवासला धरणसाखळीसाठी जुलै महिना गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक दिलासादायक ठरला आहे. एक जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणीसाठ्यात २४.५४ अब्ज घनफूट (टीएमसी) वाढ झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही वाढ १०.६७ टीएमसी इतकी होती. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये पावसाचे प्रमाण आणि धरणांच्या पाणीसाठ्यात झालेली वाढ सर्वाधिक ठरली आहे.