khadakwasla dam water
sakal
पुणे - उन्हाळ्याच्या तीव्रतेदरम्यानही खडकवासला धरणसाखळीत यंदा तुलनेने चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणसाखळीत एकूण ९.५८ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच ३२.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा २८ टक्के होता. त्यामुळे यावर्षीची स्थिती तुलनेने चांगली आहे.