
खडकवासला : पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पावसामुळे साठा झपाट्याने वाढत असून धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. टेमघर, पानशेत व वरसगाव धरणातून सोडण्यात येणारे पाणी थेट खडकवासला धरणात जमा होत आहे. धरण साखळीतील चार धरणातून विसर्ग सुरु असून मंगळवार सकाळ पासून पावसाचा जोर देखील सकाळ पासून वाढला आहे.