Khadakwasla Dam Encroachments
sakal
खडकवासला - खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाटबंधारे विभागाच्या जमिनीवरील बेकायदा अतिक्रमणांवर अखेर सोमवारी (दि. ११) मोठी कारवाई करण्यात आली. धरण परिसरातील धार्मिक स्थळ, दोन चौपाट्यांवरील टपऱ्या व स्टॉल्स, डोम, हिरव्या रंगाचे पत्राशेड, रिसोर्ट हॉटेल्स, गोठे तसेच रायकर परिसरातील मिळकती अशा एकूण सहा ठिकाणांवरील २० ते २५ हजार चौरस फूट क्षेत्रातील अतिक्रमणे हटविण्यात आली.