
खडकवासला : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणसाठा झपाट्याने वाढत असून खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि पवना धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडला जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरातील नदीकाठच्या भागात पूरस्थितीचा धोका वाढल्याने सर्व सरकारी यंत्रणा आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुणे मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या सनियंत्रण अधिकारी श्वेता कुऱ्हाडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.