Khadakwasla Dam Sakal
पुणे
Khadakwasla Dam : खडकवासला धरण साखळीत ७५ टक्के पाणीसाठा; धरण साखळी जलमय
Monsoon 2025 : खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे एकूण साठा ७४.१६% इतका भरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
खडकवासला : खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे, आज मंगळवारी (१५ जुलै) सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण पाणीसाठा २१.६२ टीएमसी, म्हणजेच ७४.१६ टक्के इतका झाला आहे.

