esakal | खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी; वाहनांच्या रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी; वाहनांच्या रांगा

खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी; वाहनांच्या रांगा

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: शासनाच्या आदेशानुसार पर्यटनास बंदी असल्याने नियम मोडून फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी हवेली पोलिसांनी पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी केली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. स्थानिक नागरिक, व्यावसायिक, शेतकरी वगळता इतरांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हवेली पोलिसांकडून शनिवार व रविवार असे आठवड्यातील दोन दिवस कडक नाकाबंदी करण्यात येत आहे.मागील एक महिण्यात हवेली पोलीसांनी तब्बल साडेतीन लाख रुपये दंड वसूल केला आहे.

पर्यटकांमुळे स्थानिकांना मनस्ताप........

नाकाबंदीच्या ठिकाणी पोलीसांनी तपासणीसाठी वाहने अडविल्यानंतर वाहनांची मोठी रांग लागते. यामध्ये स्थानिकही विनाकारण अडकून पडतात. त्यातच काही पर्यटक पोलीसांशी हुज्जत घालत थांबून राहत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते.

हेही वाचा: ST महामंडळावर महिन्याकाठी 958 कोटींचा बोजा

"जागोजागी बोर्ड लावले आहेत. प्रसारमाध्यमांवर पर्यटनस्थळे बंद असल्याच्या व पोलीस कारवाई करत असल्याच्या बातम्या येत आहेत तरीही पर्यटक या भागात येतच आहेत. आम्हाला शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनी समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. पुणे-पानशेत रस्त्यावर वाहतुकीसाठी तीस ते चाळीस गावं अवलंबून आहेत. पर्यटकांमुळे या गावांतील लोकांनाही ये-जा करताना अडचणी येत आहेत."

- सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

loading image