
Khadakwasla dam discharge today
Sakal
खडकवासला : खडकवासला धरण साखळीत पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सकाळी दहा वाजता हा विसर्ग १४ हजार ५४७ क्यूसेक इतका करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग पुढे वाढून २० हजार क्यूसेकपर्यंत जाऊ शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाच्या मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे. धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.