Khadakwasla Dam : खडकवासल्यातून ४४ दिवसांत १२.६२ ‘टीएमसी’चा विसर्ग
Water Release : खडकवासला धरणातून ४४ दिवसांत सुमारे १२.६२ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले असून, पुण्याच्या पिण्याच्या गरजांसाठी साडेआठ महिन्यांपर्यंत पुरेसे आहे.
खडकवासला : खडकवासला धरणातून १९ जूनपासून एक ऑगस्टअखेर ४४ दिवसांत मुठा नदीत १२.६२ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. म्हणजेच वरसगाव धरण एकवेळा पूर्ण भरून सोडावे लागले किंवा खडकवासला धरण तब्बल सहावेळा पूर्ण भरून सोडावे लागले आहे.