Khadakwasla Dam : पावसाचा जोर ओसरला, खडकवासला धरणातून विसर्गात घट

Pune Updates : पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला असून, आवश्यकतेनुसार त्यात बदल केला जाणार आहे.
Khadakwasla Dam
Khadakwasla DamSakal
Updated on

खडकवासला : पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग कमी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणातून २२ हजार ११७ क्युसेकने विसर्ग सुरू होता. तो रात्री नऊ वाजल्यापासून कमी करून १२ हजार ०४५ क्युसेक करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com