खडकवासला : खडकवासला धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने शनिवारी हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढून १० हजार क्युसेकपर्यंत पोहोचण्याची शक्यता मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाने वर्तवली आहे..आज शनिवारी सकाळी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली. सकाळी १० वाजता धरणातून सुरू असलेला २१०५ क्युसेक विसर्ग वाढवून ३७८९ क्युसेक करण्यात आला. सध्या पानशेत आणि वरसगाव धरणांतून प्रत्येकी ४५० क्युसेक पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने हा विसर्ग हळूहळू १० हजार क्युसेकपर्यंत वाढू शकतो, अशी माहिती मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या नियंत्रण अधिकारी. श्वेता कुहाडे यांनी दिली..Pune Crime : लाचप्रकरणी तीन महिला तलाठ्यांवर कारवाई.खडकवासला धरण साखळी तुडुंब भरलीखडकवासला धरण परिसरात झालेल्या पावसामुळे धरणसाखळी पुन्हा एकदा तुडुंब भरली आहे. शनिवारी (दि. २७ सप्टेंबर) सकाळी ६ वाजेपर्यंत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे मिळून २९.०६ टीएमसी (९९.६९ टक्के) पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २८.९६ टीएमसी (९९.३५ टक्के) साठा नोंदवला होता..विसर्ग वाढीचे टप्पे (कंसात किती तासांनी विसर्ग वाढविला)-२५ सप्टेंबर, दुपारी २:०० — ४२१ क्युसेक विसर्ग बंद-२६ सप्टेंबर, संध्याकाळी ५:०० — ८४८ क्युसेक विसर्ग पुन्हा सुरू (२७ तासांनी)-२७ सप्टेंबर, सकाळी ८:०० — २१०५ क्युसेक विसर्ग (१५ तासांनी)-२७ सप्टेंबर, सकाळी १०:०० — ३७८९ क्युसेक विसर्ग (२ तासांनी)मागील २४ तासातील पावसाची नोंद (दि. २६ ते २७ सप्टेंबर २०२५ सकाळी ६ वा.)-खडकवासला धरण : ७ मिलीमीटर-पानशेत धरण : ८ मिलीमीटर-वरसगाव धरण : ७ मिलीमीटर-टेमघर धरण : २ मिलीमीटरधरणात एक जून पासून आज अखेर पडलेला पाऊस धरणातील पाण्याची टक्केवारी-खडकवासला धरण : ८२३ मिलीमीटर पाऊस, ९५.५१% भरले-पानशेत धरण : २१५९ मिलीमीटर पाऊस, १००% भरले-वरसगाव धरण : २१५७ मिलीमीटर पाऊस, १००% भरले-टेमघर धरण : ३२२२ मिलीमीटर पाऊस, १००% भरले.प्रशासनाचा इशाराहवामान विभागाने धरण माथा किंवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुळा- मुठा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढणार आहे. निषिद्ध क्षेत्रात (ब्लू लाईन एरिया) नागरिकांनी उतरण्याचे टाळावे, असे पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण प्रशासनाने आवाहन केले आहे. नदीपात्रातील साहित्य, वाहने किंवा जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण व धरणातील आवक यानुसार विसर्ग कधीही कमी- जास्त होऊ शकतो. त्यामुळे पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.