Khadakwasla Dam Water Level : पुणेकरांची चिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत 5.27 टीएमसी पाणी कमी, चारही धरणांत 23.05 टीएमसी साठा शिल्लक

Khadakwasla Dam Chain Has 23.05 TMC Water Storage : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत २३.०५ टीएमसी म्हणजे ७९.१० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.२७ टीएमसीने साठा कमी झाला आहे.
Khadakwasla dam water level today November 2026

Khadakwasla dam water level today November 2026

esakal

Updated on: 

खडकवासला : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांत यंदा २३.०५ टीएमसी (७९.१० टक्के) पाणीसाठा शिल्लक (Pune dam water storage latest update 2026) आहे. गतवर्षी ५ नोव्हेंबरला याच धरणसाखळीत २८.३२ टीएमसी (९७.१५ टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत ५.२७ टीएमसीने कमी पाणीसाठा आहे. टक्केवारीचा विचार करता यंदाचा साठा १८.०५ टक्क्यांनी कमी आहे.

Loading content, please wait...