
खडकवासला : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असलेला ६४५१ क्युसेक विसर्ग आज सकाळी १० वाजता ८५२२ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार हा विसर्ग अधिक वाढवला जाण्याची किंवा कमी करण्याची शक्यता असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन शां. भदाणे यांनी ही माहिती दिली.