
पुणे/ खडकवासला : धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणातून रविवारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता खडकवासला धरणातून १८ हजार ४८३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, तर खडकवासला प्रकल्पामध्ये २६.५४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.