Khadakwasla dam water storage November 2026
esakal
खडकवासला : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांत मिळून २३.३७ टीएमसी (८०.१९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ३ नोव्हेंबरला याच धरणसाखळीत २८.४० टीएमसी (९७.४१ टक्के) पाणीसाठा (Khadakwasla dam water storage November 2026) होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत ५.०३ टीएमसीने साठा कमी आहे. दरम्यान, वरसगाव आणि पानशेत धरणांतून प्रत्येकी ६००, तर टेमघर धरणातून २६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. चारही धरणांतील एकत्रित पाण्याची आवक शून्य नोंदविण्यात आली आहे.