Khadakwasala Dam Water Release : घाटमाथ्यावर आणि खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं या धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. १५ हजार क्युसेकनं हे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यातच उद्या पुण्यातून दोन्ही पालख्या मुक्कामास असणार आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर वारकरी शहरात दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.