- प्रकाश शेलारखुटबाव (पुणे) - २२०० कोटी रुपये किंमतीचा खडकवासला–फुरसुंगी भूमिगत कालवा प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने ‘हिरवा कंदील’ दिल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली..यामुळे सिंचनक्षेत्राची वाढ व पाणी प्रदूषण नियंत्रणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान प्रस्तावित सुमारे २८ किलोमीटर भूमिगत बंदनळी (कालवा) प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे..या प्रकल्पासंदर्भात शनिवार (दि. ३० ऑगस्ट) रोजी कार्यकारी अभियंता योगेश सावंत आणि मेगा इंजिनिअर्सचे व्यवस्थापक राजा यांच्या उपस्थितीत राहु (ता. दौंड) येथे आमदार राहुल कुल यांनी सविस्तर चर्चा केली. प्रकल्प ठरलेल्या वेळेत आणि समन्वयाने पूर्ण करण्याबाबत बैठकीत स्पष्ट निर्देश देण्यात आले..या प्रकल्पाद्वारे खडकवासला धरणातील पाणी भूमिगत बंदनळीमार्फत थेट फुरसुंगीपर्यंत पोहोचवले जाणार आहे. यामुळे पारंपरिक उघड्या कालव्यांमधून होणारी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात रोखली जाईल आणि तीन टीएमसी पाण्याची बचत होईल. प्रशासनाच्या अंदाजानुसार, या योजनेमुळे दौंड तालुक्यासह ग्रामीण भागातील सिंचनक्षेत्र लक्षणीयरीत्या वाढेल..शेतकऱ्यांसाठी सुमारे ३ टीएमसी हंगामी पाणी उपलब्ध होऊन उत्पादनक्षमता वाढेल आणि उत्पन्नात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या प्रकल्पाचा फायदा फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित राहणार नाही. पुणे शहरातील पाणीप्रदूषण नियंत्रणासाठीही या योजनेतून मदत होणार आहे. ग्रामीण आणि शहरी पातळीवरील ही दुहेरी गरज भागवल्यामुळे राज्यातील हा प्रकल्प ‘महत्त्वाकांक्षी’ ठरणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.