
खडकवासला : खडकवासला (ग्रामीण) परिसरात खडकवासला धरण, सिंहगड किल्ला, पानशेत धरण आणि वरसगाव धरण यासारखी प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. येथे कायम पर्यटकांची वर्दळ असते. असे असतानाही प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाकडून पर्यटन व स्थानिकांना भेडसावणाऱ्या सुविधा सोडविण्यात आल्यास परिसराचा सर्वसमावेशक विकास साधता येऊ शकेल, असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.