खडकवासला प्रकल्पात पाणी उरलंय कीती; शहराला पाणी पुरणार का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात आता साडेआठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. स

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात आता साडेआठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. सध्या उन्हाळी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन पाहता शहराला आणखी किमान दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील पावसाळ्यात आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्प साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे काठोकाठ भरली होती. तसेच, जिल्ह्यातील प्रमुख धरणांतही शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. सध्या मे महिन्यात या धरणातील पाणीसाठा पंधरा ते पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. 

भीमा खोऱ्यातील सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणही यंदा तुडुंब भरले होते. परंतु उजनी धरणातील पाणीसाठा आता उणे 3.2 टीएमसी झाला आहे. टेमघर धरणाचे दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे हे धरण रिकामे करण्यात आले होते. त्यामुळे टेमघर धरणातील पाणीसाठा शून्यावर आहे. घोड धरणातील पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे. खडकवासला धरणातही पाणीसाठा 0.41 टीएमसी इतका झाला आहे.

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी) :
वरसगाव   3.73  (29.06)
पानशेत  4.37  (41.06)
खडकवासला  0.41(20.91)
टेमघर   00 (00)

एकूण साठा : 8.51 टीएमसी (28.84 टक्के)
गतवर्षीचा पाणीसाठा : 4.18 टीएमसी (14.35 टक्के)

पिकांना आवर्तन :
खरीप हंगामाच्या आवर्तनासाठी नऊ जुलै ते 14 ऑक्‍टोबरदरम्यान खडकवासला प्रकल्पाच्या उजवा मुठा कालव्यातून 9.10 टीएमसी पाणी सोडले. रब्बी हंगामासाठी 15 डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान सुमारे सहा टीएमसी पाणी देण्यात आले. एक मार्चपासून उन्हाळी पिकांसाठी आवर्तन सुरू आहे. गेल्या मार्चपासून उन्हाळी पिकांसाठी आवर्तन सुरू आहे. गतवर्षी पाणीटंचाईमुळे उन्हाळी पिकांना आवर्तन देता आले नव्हते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भीमा खोऱ्यातील काही प्रमुख धरणातील साठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी) :

माणिकडोह  0.81,  (7.99)
डिंभे  3.49   (27.97)
मुळशी  2.84  (15.37)
भामा आसखेड 3.28  (42.73)
नीरा देवघर  3.41 (29.07)
भाटघर  7.36  (31.32)
वीर  4.65  (49.39)
उजनी  -3.53  (-6.67)
 

22 गावांसह 86 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा  : 

जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मे महिन्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सहा तालुक्यांमधील 22 गावे आणि 86 वाड्यांना 31 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच, 22 विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ही संख्या कमी आहे.
जिल्ह्यातील टँकरची स्थिती (तालुका आणि टँकर) : 
आंबेगाव 12,  भोर 2,  हवेली 6,  जुन्नर 7,  खेड 3,  शिरूर 1


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Khadakwasla project now has a storage capacity of eight and a half billion cubic feet